| ||
![]() | ||
राज्याच्या प्रशासनाला गतिमान करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरवण्याचं काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १९३७ सालापासून अव्याहतपणे सुरू आहे. बदलत्या काळात आयोगाची कार्यपद्धतीदेखील बदलली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीबरोबरच्या अर्जाचा नमुना भरून तो आयोगाकडे पाठविण्याचे किंवा टपाल कार्यालयातून अर्ज विकत घेऊन भरायचे दिवस आता संपले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता एका क्लिकवर उपलब्ध झाले असून या ऑनलाइन पद्धतीची माहिती ‘व्हावी यासाठी या ऑनलाइन प्रक्रियेवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये- * राज्यसेवा परीक्षा- पूर्व व मुख्य;* सहायक/विक्रीकर निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक परीक्षा-पूर्व व मुख्य;* महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा;* महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा;* महाराष्ट्र वन सेवा परीक्षा;* दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा;* सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा;* लिपिक-टंकलेखक परीक्षा. आयोगाने जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केलेल्या सर्व परीक्षा/पदांबाबतची माहिती या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यानुसार ज्या पदाची अर्हता आपण पूर्ण करीत असाल त्या पदाच्या अर्हतेच्या दृष्टीने आपल्या माहितीची नोंदणी आयोगाच्या वेबसाइटवर करू शकता. ही माहिती आपल्या स्वत:च्या Login व पासवर्डद्वारे वापरू शकता. नोंदणी : आयोगाने जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केलेल्या एखाद्या पद वा परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराला प्रथम नोंदणी करावी लागेल. त्याकरिता आयोगाच्या www.mpsconline.gov.in या वेबसाइटवरील नोंदणीवर क्लिक करावे. स्वत:च्या पसंतीचा युजरनेम व पासवर्ड निवडावा व तो लक्षात ठेवावा. स्वत:चा ई-मेल आय. डी., स्वत:चे संपूर्ण नाव, आईचे नाव, जन्मदिनांक, स्क्रीनवरील कोड Enter करावा व I have read instruction वर क्लिक करावे. त्यानंतर save बटणावर क्लिक करावे. त्यावेळी वर नोंदविलेल्या ई-मेल आय. डी.वर Activation Link‘ पाठविण्यात येईल. आपला ई-मेल अकाऊंट उघडून त्यामधील आयोगाकडून प्राप्त झालेल्या ई-मेल आय. डी.वर क्लिक करून Link Activate करावी. एखाद्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करताना नोंदणी केलेल्या उमेदवाराला यापूर्वी भरलेली माहिती अद्ययावत करता येईल. अथवा स्वाक्षरी व फोटो नव्याने अपलोड करता येईल. एखादा अर्ज अपलोड झाल्यानंतर त्या अर्जामधील माहितीमध्ये बदल करता येणार नाही. त्यासाठी पुन्हा वेगळा अर्ज करावा लागेल व वेगळे परीक्षाशुल्क भरावे लागेल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास शेवटच्या दिनांकाचा वैध अर्ज विचारात घेतला जाणार आहे. फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे : अर्ज सादर करताना उमेदवाराजवळ स्वत:चा फोटो (रुंदी ३.५ सें.मी. x उंची ४.५ सें.मी.) व ई मेल आयडी असणे आवश्यक आहे. नोंदणीची प्रक्रिया झाल्यानंतर व स्वत:च्या युजर आय. डी. व पासवर्डद्वारे प्रवेश केल्यानंतर खालीलप्रमाणे स्वत:चा विहित आकारातील फोटो व स्वाक्षरी स्कॅन अपलोड करावा लागेल. एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विहित आकाराचा फोटो चिकटवून विहित आकारामध्ये काळ्या शाईच्या पेनने चौकोनात स्वाक्षरी करावी लागेल. फोटो स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करता येईल. फोटो आकार रुंदी ३.५ सें.मी. व फोटो उंची ४.५ सें.मी.च स्वाक्षरी रुंदी ३.५ सें.मी व उंची १.५ सें.मी. असणे गरजेचे आहे. फोटो व स्वाक्षरीची प्रत्येकाची इमेज संपूर्ण स्कॅन करून ्नस्र्ॠ फॉर्मेटमध्ये संगणकावर वेगवेगळ्या फाईल्समध्ये स्वतंत्रपणे रं५ी करावी. फोटो व स्वाक्षरीची दोन्हीची मिळून संपूर्ण इमेज ५० ‘kb पेक्षा जास्त असता कामा नये. यापेक्षा जास्त क्षमतेची इमेज या प्रणालीवर स्वीकारली जात नाही. इमेजची साईज ५० kb पेक्षा जास्त असल्यास स्कॅनरचे DPI resolution, No. of coloourd, etc द्वारे स्कॅनिंगच्या वेळी setting Adjust करता येईल. स्कॅन करून अपलोड केलेली स्वाक्षरी प्रवेशपत्र, हजेरीपट व तत्सम कारणासाठी वापरण्यात येईल. परीक्षेच्या वेळी अथवा मुलाखत/ शारीरिक चाचणीच्या वेळी अथवा अन्य कोणत्याही कारणाच्या वेळी अर्ज भरताना केलेली स्वाक्षरी व फोटो न जुळल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येणार. वैयक्तिक माहिती : प्रवेश (Login) केल्यानंतर वैयक्तिक माहिती भरण्यासाठी अथवा अद्ययावत करण्यासाठी Personal Information वर क्लिक करावे लागेल. संपर्कासाठी पत्ता: प्रवेश (Login) केल्यानंतर संपर्कासाठीचा पत्ता व इतर माहिती भरण्यासाठी अथवा अद्ययावत करण्यासाठी contact Details वर क्लिक करावे. इतर माहिती: प्रवेश (Login) केल्यानंतर इतर माहिती भरण्यासाठी अथवा अद्ययावत करण्यासाठी other Information बटणावर क्लिक करावे. अर्हता: प्रवेश (Login) केल्यानंतर अर्हतेसंबंधीची माहिती भरण्यासाठी अथवा अद्ययावत करण्यासाठी Qualification बटणावर क्लिक करावे. वरीलप्रमाणे प्रत्येक वेळी माहिती नोंदविल्यानंतर ही माहिती Save करण्यासाठी अथवा अद्ययावत करण्यासाठी Update बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची पद्धत: एखाद्या परीक्षा/ पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी प्रवेश (Login) केल्यानंतर Apply Exam/ post३ या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर संबंधित परीक्षा/ पदासमोर नमूद केलेल्या Apply बटणावर क्लिक करावे आणि अर्जामधील संबंधित परीक्षेसाठी आवश्यक असलेली माहिती भरावी. संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज करण्यापूर्वी अर्जातील माहिती अचूक असल्याची खात्री करावी, त्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्यास Reset बटन क्लिक करून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी. अर्जातील माहितीची अचूकता व सत्यतेची जबाबदारी उमेदवारांची राहणार आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर summit to MPSC बटणावर क्लिक करावे. summit to MPSC बटणावर क्लिक केल्यानंतर पुन्हा कोणताही बदल करता येत नाही. या पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर Print बटणावर क्लिक करावे व अर्जाची प्रत घेण्यासाठी print Application या बटणावर क्लिक करावे व त्याची प्रत घ्यावी. परीक्षा शुल्क भरण्यासाठी print Challan या बटणावर क्लिक करावे व चलनाची प्रत घ्यावी. भारतीय स्टेट बँकेमध्ये विहित शुल्काचा भरणा केल्यानंतर बँकेकडून चलनावर Transaction ID प्राप्त होईल. चलनावरील Transaction ID व दिनांक नमूद (Enter) केल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याकरिता उमेदवारास पुन्हा प्रवेश (Login) करावे लागेल. प्रवेश (Login) केल्यानंतर Apply Exam/pastबटणावर क्लिक करावे. त्यानंतर Update Transaction IDऊ च्या बटणावर क्लिक करावे. विहित ठिकाणी चलनावरील Transaction ID ऊ व दिनांक नोंदवावा. बँकेकडून प्राप्त झालेला Transaction ID व दिनांक अचूकपणे नमूद केल्यानंतर Submi बटणावर क्लिक करावे. त्यानंतरच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. ऑनलाइन अर्ज करताना हे लक्षात ठेवा. महिला उमेदवारांनी पूर्वाश्रमीच्या नावाने (By Birth) अर्ज करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल. पत्रव्यवहाराचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र/ वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा/ संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये. संपूर्ण भरून आयोगास सादर करण्यात आलेला अर्ज उमेदवाराला स्वत:च्या User ID व Passward द्वारेTrack Your Application मध्ये कायमस्वरूपी उपलब्ध होईल व केव्हाही पाहता येईल. अर्जाची पोच : ऑनलाईन पद्धतीने माहिती व अर्ज सादर करताना परीक्षा नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. सदर नोंदणी क्रमांकाच्या आधारे उमेदवाराला चौकशी करता येईल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून झाल्यानंतर आणि विहित परीक्षा शुल्क भरल्यानंतर भारतीय स्टेट बँकेकडून चलनाची प्रत प्राप्त होईल. त्यावर परीक्षेचे नाव, परीक्षा नोंदणी क्रमांक, दिनांक व Transaction ID उपलब्ध असेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच संबंधितांच्या अर्जाच्या स्वीकृतीबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. आयोगाच्या वेबसाइटवरील Feed back‘ द्वारे उमेदवाराला आयोगाशी पत्रव्यवहार करता येईल. परीक्षेचे नाव, जाहिरात क्रमांक व जाहिरातीचा दिनांक, परीक्षा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव व पत्ता, Transaction ID व दिनांक ही माहिती कळविणे आवश्यक आहे. महान्यूज संदर्भ सेवा |