Thursday, 26 September 2013

सरकारी नोकरी

सरकारी नोकरी 


महाराष्ट्र शासनाच्या अभियोग संचालनालयात 81 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अभियोग संचालनालयात निम्नश्रेणी लघुलेखक-इंग्रजी (15 जागा), लिपिक टंकलेखक (47 जागा), शिपाई (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑक्टोबर 2013 आहे. अधिक माहिती http://Oasis.mkcl.org/dpp2013  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात परिचारिकाच्या 400 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात परिचारिका (400 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी भरती दि. 27 सप्टेंबर 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 21 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात सहायक वैद्यकीय अधिकारीच्या 15 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालय समूहाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी (15 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 26 ते 27 सप्टेंबर 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 23 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.


राज्य उत्पादन शुल्क, मुंबई कार्यालयात जवान व वाहनचालकाच्या 12 जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क, मुंबई कार्यालयात जवान (9 जागा), जवान नि वाहनचालक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://excmumbaicity.apply2013.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माहिती व जनसंपर्कच्या औरंगाबाद संचालक कार्यालयात 17 जागा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या औरंगाबाद संचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अधिनस्त विभागीय कार्यालयात ऊर्दु अनुवादक (1 जागा), लिपिक टंकलेखक (6 जागा), सिनेयंत्र चालक (1 जागा), शिपाई/संदेशवाहक/स्वच्छक नि सेवक/चौकीदार/उषर/मदतनीस (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2013 आहे. यासंबंधीची माहितीwww.dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


राज्य लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 111 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखामधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे (111 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 6 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षकाच्या 385 जागा

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरक्षक (385 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 19 सप्टेंबर 2013 ते 19 नोव्हेंबर 2013 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...